Hero Banner
about-thumb
मनोगत

नमस्कार,

मी सौ. संगिता संजय बराटे. गेली २५ वर्षे शिक्षणसेवेच्या माध्यमातून कर्वेनगर प्रभागात कार्यरत आहे. कै. एन. जी. बराटे एज्युकेशनल ट्रस्ट आणि ब्लू बर्ड स्कूलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे आणि शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.
कर्वेनगर हे शिक्षण, समाजसेवा आणि प्रगतिशील विचारांची समृद्ध परंपरा जपणारे गाव आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या शैक्षणिक कार्यात कर्वेनगरवासीयांनी दिलेले मोलाचे सहकार्य ही या परिसराची मोठी सांस्कृतिक पायाभरणी आहे. त्या वारशाचा पुढाकार ठेवून समाजातील प्रत्येक घटकासाठी सकारात्मक आणि उपयुक्त कार्य करण्याचा मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
परंतु बदलत्या काळात कर्वेनगरसमोर नव्या प्रकारचे नागरी प्रश्न उभे ठाकले आहेत. पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, रस्ताविकास, उद्याने आणि सामुदायिक सुविधा, शाळा महाविद्यालयांच्या गरजा, वाढत्या प्रकल्पांचा दबाव, वाहतूक कोंडी, सुरक्षिततेचे प्रश्न- या सर्व बाबी आज निर्णायक टप्प्यावर उभ्या आहेत.
कर्वेनगरसाठी आता केवळ सामाजिक पातळीवरील काम पुरेसे नसून राजकीय इच्छाशक्ती, व्यवस्थेत सहभाग आणि निर्णयक्षम नेतृत्वाची आवश्यकता स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत कर्वेनगरच्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे.


counter-icon

5

+

वर्षे राजकीय सेवा

counter-icon

100

+

आयोजित कार्यक्रम

counter-icon

150

+

राबवलेले उपक्रम

counter-icon

200

+

विविध विकास कामे

अहवाल कामाचा

01

घरेलू कामगार मोफत नोंदणी व लाभ

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत प्रभागातील घरेलू कामगार महिलांची मोफत नोंदणी करून, संसार उपयोगी भांडी सेट चे वितरण करण्यात आले.

02

बचत गट स्थापनेसाठी बैठका

प्रभागातील गृहिणी व घरेलू कामगारमहिलांना एकत्र करून त्यांना बचत गटस्थापन करण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले.

03

प्रभागातील महिला करिता कोर्सेसचे

कर्वेनगर भागातील महिला व युवतींकरिता मोफत स्पोकन इंग्लिश, ब्युटी पार्लर व टीचर ट्रेनिंग, योगा प्रशिक्षण, शिलाई प्रशिक्षण, कुकिंग, व्यक्तिमत्व विकास क्षिबीरांचे आयोजन.

04

स्वनिधी योजना

कर्वेनगर भागातील 500 हून अधिक नागरिकांना केंद्र शासन पुरस्कृत स्वनिधी योजने अंतर्गत 10,000/20,000 व 50,000 कर्ज मंजूर करून देण्यात आले.

Any emergency help call us

+91 7559430081